अनाधिकृत खाद्यपदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

0

भुसावळ । रेल्वे स्थानकावर अनाधिकृतरित्या खाद्य पदार्थ विक्री करणार्‍यांविरुध्द रेल्वे सुरक्षा दलातर्फे कारवाई करण्यात आली यामध्ये 24 वेंडर्सला ताब्यात घेण्यात आले आहे. आरपीएफ निरीक्षक व्ही.के. लांजीवार यांच्या मार्गदर्शनाखाली राकेश कुमार, हरणे, भागवत सोनवणे, सहाय्यक निरीक्षक शाह, हेडकॉन्स्टेबल रोशनसिंग, हेडकॉन्स्टेबल कोळी, कॉन्स्टेबल दिपक शिरसाठ, योगेश घुले यांच्या पथकाने कारवाई केली. यास आळा घालण्यासाठी कारवाईत सातत्य राखण्याची आवश्यकता आहे.

73 पुरुष प्रवाशांना अटक
तसेच महिला डब्यात प्रवास करणार्‍या पुरुष प्रवाशांविरोधात देखील तक्रारी वाढल्या आहेत. रेल्वेने महिला प्रवाशांसाठी डबा आरक्षित केला आहे. मात्र यात पुरुषही प्रवास करतात याचा त्रास महिलांना होत असून याविरोधात रेल्वे सुरक्षा दलातर्फे अभियान राबविण्यात आले. यासंदर्भात महिला प्रवाशांकडून आलेल्या तक्रारीची दखल घेण्यात येऊन 73 पुरुष प्रवाशांना रेल्वे सुरक्षा दलाच्या कर्मचार्‍यांनी ताब्यात घेऊन त्यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे.