खेळांमधील यश तुमच्या बोटांच्या लांबीवर अवलंबून असते. कदाचित पटणार नाही. पण ते तसंच आहे. ५७ मुलांच्या तर्जनी आणि अनामिका या बोटांची लांबी आणि त्यामधला फरक युनिव्हर्सिटी ऑफ साऊथ ऑस्ट्रेलियाचे संशोधकांनी मोजला आणि त्यावरून निष्कर्ष काढले.
अनामिकेची लांबी पुरूषांमध्ये तर्जनीपेक्षा जास्त असते. महिलांमध्ये ही लांबी सारखी असते, असं डॉ. टॉमकिन्सन सांगतात. टेस्टोस्टीरिओनचे प्रमाण आणि या बोटांची लांबी एकमेकांशी संबंधित असतात. गर्भात असताना हे हार्मोन जास्त प्रमाणात असेल तर अनामिकेची लांबी जास्त असते. त्यामुळे बोटांच्या लांबीचे गुणोत्तर कमी असते. टेस्टेस्टेरॉन हे नैसर्गिक हार्मोन खेळातील स्टॅमिना आणि फिटनेसशी संबंधित आहे. स्नायु मजबूत असतील तर खेळाडूला चांगला खेळ करून दाखविणे सोपे जाते. उक्त दोन बोटांच्या लांबीचा भागाकार जर कमी आला तर हार्मोनचे प्रमाण जास्त असा अर्थ निघतो. त्यामुळे बोटांच्या लांबीचा असा संबंध खेळांमधील कौशल्याशी आहे. हे संशोधन अर्ली ह्यूमन डेव्हलपमेंट जर्नलमध्ये प्रसिद्ध करण्यात आलेले आहे.