अनिकेत पाटील यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव ; विविध कार्यक्रमांचे आयोजन

0

भुसावळ- रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य अनिकेत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शनिवारी शहरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले. साकरी ते शिर्डी दरम्यान निघालेल्या पदयात्रेत अनिकेत पाटील हे कार्यकर्त्यांसह सहभागी झाले. थंडीपासून संरक्षण होण्यासाठी शहरातील गरजूंना कानटोपी व फराळाचे वाटप करण्यात आले. नरेंद्र मोदी विचारमंचचे तालुकाध्यक्ष नारायण कोळी, पृथ्वीराज पाटील, दलजीत चौधरी, साकरीचे माजी उपसरपंच दिलीप फालक यांच्यासह साईभक्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.