अनिल कुंबळेचा मुख्य प्रशिक्षक पदावरून राजीनामा

0

मुंबई । चॅम्पियन ट्रॉफीच्या सुरवातीलाच कर्णधार विराट कोहली व मुख्य पशिक्षक अनिल कुंबळे याच्यात मतभेद असल्याचे वृत्त येत होते. चॅम्पियन्स करंडकात अंतिम सामन्यात बसलेल्या पराभवाच्या धक्क्यानंतर भारतीय क्रिकेट संघाला आणखी एक धक्का बसला आहे. भारतीय संघाचे प्रशिक्षक अनिल कुंबळे यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. चॅम्पियन्स ट्रॉफीनंतर भारताचा संघ आज वेस्ट इंडिजकरता रवाना होणार होता. मात्र कुंबळेने संघासोबत न जाता लंडनमध्ये आयसीसीच्या बैठकीला हजेरी लावणे पसंत केले.त्यावेळीच भारतीय संघात सारंकाही आलबेल नसल्याची चिन्हे दिसून येत होती. त्यानंतर कुंबळेने दिलेला प्रशिक्षकपदाचा राजीनामा घोतक होते.बीसीसीआयसोबत झालेल्या करारानूसार कुंबळेचा प्रशिक्षक म्हणून आज शेवटचा दिवस होता, आणि यापुढे आपण प्रशिक्षक म्हणून काम पाहण्यास उत्सुक नसल्याचे कुंबळेने स्पष्ट केल्याचे समजतेय.