अनिल कुंबळेचा विक्रम अश्‍विनने तोडला

0

नवी दिल्ली । मायदेशात एकाच सीजनमध्ये सर्वाधिक षटके टाकण्याचा विक्रम भारताचे प्रशिक्षक अनिल कुंबळे याच्या नावावर होता. मात्र तो विक्रम आर.अश्‍विनने तोडला आहे. भारत आणि ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या 4 कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना सुरू आहे. या सामन्यात मायदेशात एकाच सीजनमध्ये सर्वाधिक षटके टाकविण्याचा विक्रम आर. अश्‍विनने आपल्या नावावर नोंदविला आहे.

अश्‍विनने या हॅगामात टाकली 622 षटके
आर. अश्‍विनने भारताचा माजी दिग्गज फिरकीपटू अनिल कुंबळे याला मागे टाकले आहे. अश्‍विनने या सीजनमध्ये 622 षटके टाकली आहेत. तर कुंबळेने 2004-05मध्ये 612 षटके टाकली होती. आर. अश्‍विनने आतापर्यंत खेळलेल्या एकूण 11 कसोटी सामन्यात ही कामगिरी केली आहे.

मालिकेतील दुसर्‍या सामन्यात भारताचा पहिला डाव 189 धावातच गुंडाळला आहे. त्यानंतर फलंदाजीस आलेल्या ऑस्ट्रेलियाने दुसर्‍या दिवसाचा खेळ संपण्यापूर्वी 6 गडी बाद 237 धावा केल्या आहेत. ऑस्ट्रेलियाने एकूण 48 धावांची आघाडी घेतली आहे.