अमळनेर । तालुक्याचे शिवसेना प्रमुख अनिल अंबर पाटील यांची सेनेतून हकालपट्टी करण्याचा निर्णय अमळनेर येथील बैठकीत घेतल्याची घोषणा जिल्हा प्रमुख गुलाबराव वाघ यांनी केली. अमळनेरात जुना टावून हॉलमध्ये झालेल्या सेना कार्यकर्त्यांची बैठकीत हकालपट्टीची घोषणा करण्यात आली. गुलाबराव वाघ यांनी आगामी 17 ग्रामपंचायतीच्या लोकनियुक्त सरपंच पदाच्या निवडणूक बाबत मार्गदर्शन केले. यावेळी ब14 तरुणांनी शिवसेनेत प्रवेश केला. नगरसेवक संजय पाटील, विजय पाटील, प्रताप शिंपी, नितीन निळे, किसन पाटील, देवेंद्र देशमुख, चंद्रशेखर भावसार किरण पवार रवींद्र पाटील , मोहन भोई, दीपक बोरसे, जीवन पवार, मनोज पाटील उपस्थित होते.