अनिष्ट रूढी-परंपरांना फाटा देत त्यांनी बांधली जीवनगाठ

0
रावेर शहरात झाला मराठा समाजातील आदर्श विवाह
रावेर:- अनिष्ट चालीरिती व प्रथांना फाटा देत रावेर शहरात मराठा समाजातील विवाह पार पडला. या विवाहात साखरपुडा,भात बांधणे पासून ते हुंडा घेण्याच्या अनेक चालीरिती मोडून काढण्यात आल्या. शेनाबाई गोंडू पंडीत मराठा समाज मंगल कार्यालयात झालेल्या विवाह सोहळ्याचे समाजातून कौतुक होत आहे.
हुंडा घेण्यास वराकडील मंडळींचा नकार
विवरे बु.॥ येथील पंढरीनाथ गोविंदा पाटील यांची पुतणी ममता प्रभाकर पाटील हिचा विवाह अजंदा (ता.रावेर) येथील सुधाकर दामोदर पाटील यांचे पुतणे निखीलेश बाळू पाटील यांच्याशी झाला. या विवाहात मुलाचे काका सुधाकर पाटील यांनी सर्व अनिष्ट चालीरिती व प्रथेला फाटा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर त्यांच्या पाचही भाऊंनी त्यास होकार दिला. नवरदेवाने विवाहात हुंडा घेतला नाही तर या आधी साखरपुडाही करण्यात आला नाही तसेच भात न बांधण्याच्या निर्णय देखील वराकडील मंडळी घेत ताटाला नारळ लावण्याची प्रथेलाही नकार देत आदर्श विवाह समाजातील मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला. यात अनेक प्रथा मोडीत काढण्याचे धाडस मुलाचे काका सुधाकर पाटील व मुलीचे काका पंढरीनाथ पाटील यांनी केल्याने मराठा विकास मंडळाचे संचालक यादवराव पाटील, राजेंद्र पाटील व उपस्थित समाजबाधवांनी त्यांचे अभिनंदन केले.