‘अनुकंपा’वर न घेतल्याने पालिकेसमोर उपोषण

0

शहादा। येथील नगरपालिकेसमोर कमलेश किसन डुडवे (वय 27) हा आपल्या पत्नीसोबत आमरण उपोषणाला बसला आहे. कमलेश याच्या म्हणण्यानुसार त्याचे काका रतिलाल सुकलाल डुडवे व काकु लिलाबाई रतिलाल डुडवे हे नगर पालिकेत कायम स्वरुपी नोकरीस होते. काका हे कामावर असतांना साधारण 20 वर्षापूर्वी अपघातात वारले. त्यांनी कमलेश यास वारसपुत्र घोषित केले होते. काकुदेखील नगरपालिकेत कामाला होत्या. परंतु त्याना कुठल्याही प्रकारचे पेंशन मिळत नाही. याबाबत विचारणा केली असता 20 वर्ष सर्व्हीस झाली नाही त्यामुळे पेंशन अदा करता येणार नाही असे नगरपालिका अधिकारी म्हणत असल्याचे सांगितले.

कमलेशने देखील नगरपालिकेत काही वर्ष काम केली पण त्याला कुठलाच पगार अथवा मोबदला मिळाला नसल्याचे त्याने सांगितले. माझ्यावर परिवारासोबत काकुंची पण जबाबदार आहे. व उदरनिर्वाह करण्यासाठी कुठलाच पर्याय नाही त्यामुळे जिल्हाधिकारी स्वत: दखल घेत नाही व मला कामावर घेत नाही तोपर्यंत मी पत्नीसोबत आमरण उपोषणाला बसेन असे सांगिले आहे. आज उपोषणाचा हा तिसरा दिवस आहे.