अनुदानित शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे

0

वरणगाव । नगरपालिकेअतंर्गत गेल्या दोन महिन्यापासून शहर हगणदारीमुक्ती करीता वैयक्तीक शौचालयाच्या बांधकामास प्राधान्य देऊन पालिकेने शहर हागणदारीमुक्तीचा विळा उचलला आहे. वैयक्तीक शौचालयाचे बांधकाम पूर्णत्वाकडे वाटचाल करीत असून आणि पूर्ण झालेल्या शौचालयाचे बाधकाम लाभार्थीच्या नावे केली जात आहे. यासंदर्भात मंगळवार 7 रोजी नगराध्यक्षा अरुणा इंगळे व नगरसेवकांनी शहरात प्रभागनिहाय ठिकठिकाणी भेटी देऊन पुर्ण झालेल्या शौचालय बांधकामाची पाहणी करण्यात आली.

नगराध्यक्षांनी केले मार्गदर्शन
केंद्र शासन व महाराष्ट्र शासनामार्फत गावपातळीवर हगणदारीमुक्तीचा संकल्प करण्यात आला असून त्याच माध्यमातून वरणगाव पालिकेने गेल्या दोन महिन्यापासून शहरातील नागरीकांना वैयक्तीक शौचालय संदर्भात अनुदानीत तत्वावर वारंवार सूचना देवून व शौचालयासंदर्भात फायदे व होणारे आजाराविषयी माहिती दिली जात आहे. उघड्यावर शौचास बसल्यामुळे परिसरात रोगराईचा फैलाव होऊन शहरातील नागरिकांच्या आरोग्यास बाधा पोहचते त्यामुळे नागरिकांनी वैयक्तिक शौचालय वापराबद्दल प्रशासनातर्फे आवाहन करण्यात येत आहे. यासंदर्भात पालिका प्रशासनाने लाभ दिलेल्या लाभार्थ्याचे वैयक्तीक शौचालय बांधकाम पूर्ण झालेल्याचे पाहून पालिकेकडून शिक्का मोर्तब करण्यात आले. यावेळी प्रभाग 17 क्रमांक व प्रभाग क्रमांक 14 च्या नगरसेविका व नगराध्यक्षा अरुणा इंगळे व नगरसेविका माला मेढे यांच्या प्रभागात पूर्णत्वाकडे असणार्‍या शौचालयाची पाहणी करण्यात आली.

पाहणीदरम्यान यांची होती उपस्थिती
यावेळी नगराध्यक्षा अरुणा इंगळे पालिकेचे मुख्याधिकारी प्रशांत सरोदे, उपनगराध्यक्ष शेख अखलाक, नगरसेवक सुधाकर जावळे, नगरसेविका प्रतिभा चौधरी, सामाजिक कार्यकर्ते मिलींद मेढे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कर्मचारी रविंद्र गायकवाड, संजय माळी आदींनी पाहणी केली.