चेन्नई । भारतासारख्या बलाढ्य संघाविरुद्धच्या कठीण परीक्षेआधी एक अनुभवहीन संघाशी दोन हात करणे हे कुठल्याही संघासाठी आदर्श तयारी समजली जात नाही. मंगळवारपासून सुरू होणार्या अनुभवहीन अध्यक्षीय संघाविरुद्धच्या सामन्यात पुढील आव्हाने लक्शात घेऊन स्टिव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलियन संघ पूर्ण तयारीनिशी मैदानात उतरेल.
स्टीव्ह स्मिथचा ऑस्ट्रेलियन संघ बांगलादेशविरुद्धची दोन कसोटी सामन्यांची मालिका अनिर्णीत राखून भारतात दाखल झाला आहे. मंगळवारवारी खेळल्या जाणार्या सामन्यात त्यांना एकदिवसीय क्रिकेटच्या प्रारूपात बदल करण्याची संधी मिळेल. एकदिवसीय सामन्यातील विद्यमान जगजेते असलेल्या या संघाला फिरकी गोलंदाजांना खेळताना खूप त्रास झाला होता. फिरकीला फायदेशीर ठरणार्या खेळपट्ट्यांवर खेळाडूंमध्ये ताळमेळ राखणे कठिण जाणार असल्याचे खुद्द स्टीव्ह स्मिथने कबूल केले आहे.
या सामन्यात गुरकिरत मान या एकमेव आंतरराष्ट्रीय सामने खेळलेल्या गोलंदाजाचा सामना ऑस्ट्रेलियन फलंदाजांना करायला मिळणार आहे. गुरकिरतने 2016 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध तीन एकदिवसीय सामने खेळले होते त्यानंतर त्याला राष्ट्रीय संघात स्थान मिळवता आले नाही. भारतातले अ श्रेणीतील अनेक क्रिकेटपटू दुलीप करंडक स्पर्धेत व्यस्त आहेत. त्यामुळे निवड समितीनेही ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सराव सामन्यासाठी अनुभवहीन खेळाडूंची निवड केली आहे. पण या निवडीमुळे या खेळाडूंना ऑस्ट्रेलियासारख्या मातब्बर संघाविरुद्ध खेळण्याची संधी मिळाली आहे.
या सामन्यामुळे ऑस्ट्रेलियन संघापेक्शा अध्यक्षीय संघातील खेळाडूंचा सगळ्यात जास्त फायदा होणार आहे. ऑस्टेे्रलियाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर हे पाहुण्या संघातील दोन महत्वाचे फलंदाज आहेत. वॉर्नरने बांगलादेशात दोन शतके झळकवली होती. अनुभवी आरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल आणि इतर खेळाडू अपेक्षेनुसार खेळ करतील, ही स्मिथची अपेक्षा असेल.