जळगाव : अनुभूति निवासी शाळेत 27 डिसेंबर ते 1 जानेवारी दरम्यान वाणिज्य सप्ताहाचे आयोजन करण्यात आले हा सप्ताहा उत्साहात पार पडला. अनुभूती निवासी स्कूलच्या विद्यार्थ्यांनी कॅशलेस व्यवहाराबाबत हस्तपत्रके वाटून, पथनाट्य सादर केले त्यामाध्यमातून कॅशलेस व्यवहारासंबंधी जनजागृती केली. विद्यार्थ्यांमध्ये अभ्यासासोबत व्यवहाराचे देखील ज्ञान व प्रात्यक्षिकाचा लाभ घेता यावा या दृष्टीकोनातून वाणिज्य शाखेतील विदयार्थ्यांचा वाणिज्य सप्ताहात सहभाग असतो.
यांचे लाभले कार्यक्रमाला सहकार्य
बदलत्या काळानुसार शिक्षणाचे व व्यवहाराचे तंत्र व अध्ययन दिवसागणिक बदलत आहे. याचा अभ्यास करूनच सप्ताहाच्या पहिल्या दिवशी जाहिरात तंत्र, लोगो क्विझ याबाबत प्रकाशझोत टाकण्यात आला होता. या महोत्सवासाठी अनुभूती स्कूलच्या संचालिका निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव यांचे मार्गदर्शन लाभले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्व शिक्षकवृंदांचे सहकार्य लाभले.