अनुभूतीचे विद्यार्थी 3 जानेवारी रोजी दूरदर्शनवर

0

जळगाव । येथील अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या विद्यार्थ्यांचा नृत्याविष्कार 3 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवरून प्रसारीत होणार आहे. शालेय शिक्षण विभाग, अखिल  भारतीय मराठी चित्रपट महामंडळ तसेच प्राथमिक व माध्यमिक शिक्षक संघ यांच्या संयुक्त विद्यमाने विभागीय लोकनृत्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या विद्यार्थ्यांना ज्ञानेश्‍वर सोनवणे यांचे मार्गदर्शन लाभले.

दोन्ही गट स्पर्धेत प्रथम
अनुभूती स्कूलच्या लहान आणि मोठ्या गटातील संघ या विभागीय स्पर्धेत सहभागी झाले होते. त्यात विद्यार्थ्यांनी उत्तम सादरीकरण करून दोन्ही गट या दोन्ही स्पर्धेत प्रथम आले आहेत. या दोन्ही गटातील विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या नृत्याविष्काराचे प्रसारण 3 जानेवारी रोजी सायंकाळी साडेसात वाजता होणार आहे. विद्यार्थ्यांचा हा कार्यक्रम आवर्जून बघावा असे आवाहन अऩुभूती स्कूलच्या संचालिका सौ. निशा जैन आणि अनुभूती इंग्लिश मीडियम स्कूलच्या प्राचार्या रश्मी लाहोटी यांनी केले आहे.