जळगाव । मुंबई येथे सुलोचना देवी सिंघानिया शाळेत संपन्न झालेल्या महाराष्ट्र राज्यस्तरीय बँडमिंटन स्पर्धेत जळगाव येथील अनुभूती निवासी शाळेतील तीन विद्यार्थ्यांची राष्ट्रीय स्तरावर निवड झाली आहे. वय 19 वर्ष वयोगटातील स्पर्धेत इ. 12 वीत शिकणारी विद्यार्थींनी निधी काकंरीया ही दुसरी आली, अंशिका गुर्जर तिसरी तर रिषभ राका याने चौथा क्रमांक पटकाविला आहे.
निवड झालेले विद्यार्थी बंगरूळ येथे होणार्या राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत महाराष्ट्र संघाच्या वतीने खेळणार आहेत. त्यांना क्रीडाशिक्षक शिवम दिक्षित, बॅडमिंटनचे प्रशिक्षक बादशाह सैय्यद यांचे मार्गदर्शन लाभत आहे. विद्यार्थ्यांच्या या यशाबद्दल संचालिका सौ. निशा जैन, प्राचार्य जे. पी. राव यांनी अभिनंदन केले आहे.