अनुभूती शाळेचा दशकपूर्ती सोहळा

0

जळगाव । अनुभूती स्कूलचे संस्थापक भवरलालजी जैन यांच्या स्वप्नातील शाळा आज दहा वर्षे पूर्ण करीत आहे. या दहा वर्षात शैक्षणिक क्षेत्रात शाळेची भारतभर किर्ती पोहोचली. याचमुळे दिल्लीपासून तर चेन्नई पर्यंतचे विद्यार्थी येथे शिक्षण घेत आहेत, असे प्रतिपादन अनुभूती निवासी स्कूलचे प्राचार्य जे.पी. राव यांनी केले. अनुभूती निवासी शाळेत दशकपूर्ती सोहळ्यानिमित्त विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला होता त्यात ते बोलत होते. यावेळी सेवादास दलूभाऊ जैन, अतुल जैन, यु.व्ही.राव, विजय राघवन यांचेही समयोचित भाषणे झाली. अनुभूती निवासी शाळेच्या 10व्या स्थापना दिनाच्या कार्यक्रमाचे उदघाटन सेवादास दलूभाऊ जैन, जैन इरिगेशनचे अध्यक्ष अशोक जैन, सहव्यवस्थापकीय संचालक अजित जैन, संचालिका निशा जैन, गिमी फरहाद यांच्या हस्ते दीपप्रज्वलन तसेच अनुभूतीचे नियतकालीक ‘स्नीक पीक’ याचे प्रकाशन करण्यात आले. निखिल क्षीरसागर व अनुभूतीच्या विद्यार्थ्यांनी श्लोक आणि प्रार्थना सादर केली.

सात वर्षांचा अनुभव मान्यवरांकडून व्यक्त
जो काही वर्षांचा विचार करतो, तो फळबागा लावतो. पण जो पुढील अनेक पिढ्यांचा विचार करतो तो शिक्षणाचे बीज लावतो. मोठ्याभाऊंनी केलेल्या मार्गदर्शनानुसार या शाळेची वाटचाल सुरू आहे असेही कार्यक्रमात सांगण्यात आले. रौनक धूत याने त्याच्या शाळेतील अनुभव स्वयंरचित हिंदी कवितेतून सांगितले.