अनुराधा गवारे यांना आदर्श महिला पुरस्कार

0

चिंबळी : खेड तालुक्याच्या दक्षिण भागातील औधोगिक क्षेत्रात ग्रामीण भागातील ग्रामपंचायतीच्या माध्यमातून घेतलेल्या समाज सेवेच्या विशेष योगदाना बद्दल माजी सहकार आयुक्त एस.बी.पाटील हस्ते काव्य मित्र संस्थेच्या वतीने मोई गावच्या सरपंच अनुराधा साधिक गवारे यांना राष्ट्रीय आदर्श महिला पुरस्कार देण्यात आला.

शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रात कार्य करत असणार्‍या व्यक्तीचा प्रोत्साहन व गौरव काव्यमित्र संस्था करत असते.याप्रसंगी लिज्जत पापड समुहाचे सीईओ सुरेश कोते, माजी सहकार आयुक्त एस.बी.पाटील, मोईचे सामाजिक कार्यकर्ते सादिक गवारे, श्री समर्थ ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष शिवाजी गवारे, ग्रामसेवक मयुर उगले, विवेक गवारे, रोहिदास गवारे, समीर गवारे,प्रशांत थोरवे, अभिजीत आवटे, पाडूरंग गवारे, मालन हजारे, गिताजंली गवारे, साधना गवारे, मंगल गवारे, लंका गवारे, सविता दाभाडे, सुजाता नढे, पुजा होरे, नंदा येळवंडे, विध्या गवारे, आदि मान्यवर उपस्थित होते.