अनुराधा पौडवाल जेजुरी विश्वस्तपदासाठी इच्छुक!

0

सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात मुलाखतही दिली

पुणे : महाराष्ट्राचे कुलदैवत असलेल्या जेजुरी मार्तंड देवस्थान विश्वस्तपदासाठी ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल इच्छुक असून यासाठी त्यांनी पुण्यातील सहधर्मादाय आयुक्त कार्यालयात मुलाखतही दिली आहे. येत्या दोन महिन्यांत अंतिम सहा विश्वस्तांची निवड केली जाईल, असे अधिकार्‍यांनी सांगितले.

256 जणांनी अर्ज
जेजुरी देवस्थानच्या विश्वस्तपदासाठी गायक, आमदार, निवृत्त न्यायाधीश, वकील, सामाजिक कार्यकर्ते, डॉक्टर, शिक्षक, उद्योजक, शेतकरी आणि इतर देवस्थानांचे विश्वस्त अशा 256 जणांनी अर्ज केले होते. या इच्छूकांच्या मुलाखती पुण्यातील सहधर्मादाय आयुक्त शिवाजी कचरे यांच्या कार्यालयात घेण्यात आल्या. गायिका अनुराधा पौडवाल यांनीही विश्वस्तपदासाठी मुलाखत दिल्याचे सांगण्यात आले.

अंतिम यादी लवकरच
अर्जांची छाननी प्रक्रिया सुरू असून अंतिम यादी लवकरच जाहीर केली जाईल. विश्वस्तपदासाठी गायिका अनुराधा पौडवाल यांनीही अर्ज केला होता. त्यांनी स्वतः कार्यालयात येऊन मुलाखत दिली आहे.
-शिवाजी कचरे, आयुक्त, सहधर्मादाय