अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी वसतीगृह योजना

0

जळगाव। राज्यातील अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचा शैक्षणिक विकास व्हावा यासाठी शासन स्तरावर विविध उपक्रमर राबविण्यात येत आहे. अनुसुचित जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठी मोफत वसतीगृह उपलब्ध व्हावे यासाठी दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आली आहे. यात विभागीय, जिल्हा, तालुका व ग्रामीण स्तरावर अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी आदिवासी विकास विभागाद्वारे शासकीय वस्तीगृह योजना कार्यान्वित आहे. तसेच विभागीय व जिल्हा स्तरावर 12 वी व त्यापुढील उच्च शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतीगृहात प्रवेश न मिळालेल्या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना 2016-17 या शैक्षणिक वर्षापासून आदिवासी विभागाव्दारे लागू करण्यात आली आहे.

ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन
सन 2017-18 या शैक्षणिक वर्षात विभागीय व जिल्हास्तरावर इयत्ता 11 वी नंतर पुढे शिक्षण घेणार्‍या अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना शासकीय वसतीगृह अथवा पंडीत दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना यापैकी कोणत्याही एका योजनेत निवडीसाठी प्रात्र असणार आहे. प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन अर्ज नोंदणी करावयाची आहे. ऑनलाईन अर्जाची प्रत वसतीगृहाचे अधीक्षक यांच्याकडे सादर करावयाचे आहे. ऑनलाईन अर्ज करतांना काही तांत्रीक अडचणी येत असल्यास नजीकच्या वसतीगृहाचे अधीक्षकांशी संपर्क साधावा. असे प्रकल्प अधिकारी एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प यांनी कळविले आहे.