जळगाव: अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांना मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परिक्षा फी (फ्रिशिप) योजनेसंबधी महाविद्यालय पातळीवर तसेच विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने तसेच हार्ड कॉफी आवश्यक कागदपत्रांसह २४ सप्टेंबर, २०१८ पर्यंत कार्यालयास सादर करावेत. असे आवाहन आर. बी. हिवाळे, प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प, यावल यांनी केले आहे.
ई-ट्रायबल या संगणक आज्ञावलीतील प्रलंबित असलेले कोणतेही अर्ज महाडिबीटी पोर्टलव्दारे निकाली काढण्यात येणार नाही. याची सर्वांनी नोंद घ्यावी. याबाबत प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव यांच्या अध्यक्षतेखाली २४ सप्टेंबर, २०१८ रोजी सकाळी ११.०० वाजता एम. जे. महाविद्यालय, जळगाव येथे बैठकीचे आयोजन केले आहे. त्यानुसार प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, यावल, जि. जळगाव अंतर्गत असलेल्या जळगाव जिल्ह्यातील महाविद्यालयांना व विद्यार्थ्यांना जाहिर आवाहन करण्यात येते की, सन २०१८-१९ या शैक्षणिक वर्षापासून महाराष्ट्र शासनामार्फत शिष्यवृत्तीच्या सर्व योजना संकेतस्थळावरुन सुरु करण्यात येत येणार असल्यामुळे पुर्वीचे ई-ट्रायबल हे संकेतस्थळ बंद होणार असल्याने भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेअंतर्गत https://etrbal.maharashtra.gov.in या संगणक अज्ञावलीतील सन २०१२-१३ते २०१७-१८ या शैक्षणिक वर्षातील अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांचे मॅट्रीकोत्तर शिष्यवृत्ती व शिक्षण फी, परिक्षा फी (फ्रिशिप) योजनेसंबधी महाविद्यालय पातळीवर तसेच विद्यार्थीस्तरावर अर्ज प्रलंबित असलेले पात्र विद्यार्थ्यांचे अर्ज ऑनलाईन पध्दतीने तसेच हार्ड कॉफी आवश्यक कागदपत्रांसह वेळेत सादर करावेत.
तसेच जळगाव जिल्ह्यात असलेल्या सर्व विद्यालयीन/महाविद्यालयीन प्राचार्य तसेच संबधीत शिष्यवृत्तीचे कामकाज हाताळणारे लिपीक यांनी सदर बैठकीस उपस्थित राहावे, असे आवाहन प्रकल्प अधिकारी आर. बी. हिवाळे यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.