अनु.जाती व नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांना ‘स्वाधार’तून मिळणार लाभ

0

भुसावळ- अनुसूचित जाती तथा नवबौद्ध घटकांतील विद्यार्थ्यांसाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरू करण्यात आली असून योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज वितरण आणि अर्जांची स्वीकृती 10 जुलैपासून सुरू करण्यात येणार आहे. मागासवर्गीय शासकीय वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या तथा शासकीय वसतिगृहात प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. इयत्ता अकरावी, बारावी तसेच नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश मिळालेल्या विद्यार्थ्यांना पुढील शिक्षण घेता यावे म्हणून भोजन, निवास व इतर शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वत: उपलब्ध करून घेण्यासाठी आवश्यक रक्कम संबंधित विद्यार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये थेट जमा करण्यासाठी ही योजना सुरू केली आहे. शासन निर्णयातील अटी व शर्तीनुसार शासकीय वसतिगृहात प्रवेश घेणे किंवा भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचा लाभ घेणे असे दोन पर्याय विद्यार्थ्यांकडे आहेत.