जळगाव। रविवारी 30 रोजी संपुर्ण राज्यभरात स्टाप सिलेक्शन कमीशन (एस.एस.सी) मार्फत मल्टी टास्कींग पदासाठी परिक्षा घेण्यात आली. जळगाव शहरातील विविध केंद्रांवर ही परिक्षा घेण्यात आली. सकाळी 10-12 यावेळेत ही परिक्षा घेण्यात आली. परिक्षा सुरु होण्याच्या आधी अर्धातास परिक्षा केंद्रावर उपस्थित राहणे बंधनकारक होते. मात्र अनेक परीक्षार्थी हे परिक्षा केंद्रावर उशीरा पोहोचले त्यामुळे त्यांना परीक्षेला बसु दिले गेले नसल्याने अनेकांना परीक्षेपासून वंचीत रहावे लागले.
परीक्षेसाठी जिल्हाभरातून आले होते विद्यार्थी
परिक्षार्थींना काही मिनीटे परिक्षा केंद्रावर पोहोचण्यास उशीर झाल्याने परीक्षा केंद्रात प्रवेश नाकारण्यात आला. तसेच विद्यार्थ्यांना केंद्राच्या बाहेर काढण्यात आले. प्रशासनाच्या या निर्णयामुळे विद्यार्थ्यानी तीव्र नाराजी व्यक्त केली. परिक्षा देण्यासाठी जिल्ह्याभरातील विविध ठिकाणाहुन विद्यार्थी आले होते. खेडे गावातुन जळगाव शहरात येण्यासाठी उशीर झाल्याने अनेकांना परिक्षा केंद्रावर वेळेत पोहोचता आले नाही.
विद्यार्थ्यांना अश्रृ अनावर
स्टाप सिलेक्शन कमीशनची परीक्षा पुन्हा घेण्यात यावी अशी मागणी विद्यार्थी करीत आहे. शहरातील 14 परीक्षाकेंद्रावर मल्टी टास्कींग कर्मचारी या पदासाठी परीक्षा घेण्यात आली. विद्यार्थ्यांकडून विनविण्या केल्यानंतर देखील परीक्षेला बसण्याची परवानगी देण्यात आली नाही. परीक्षेला बसू न दिल्याने परीक्षार्थींचे अश्रु अनावर झालेले.