शिरपुर:तालुक्यातील फत्तेपूर ग्रामपंचायत अंतर्गत कुंबीपाडा येथे पत्नीशी बापाचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयावरून मुलाने बापास कुऱ्हाडीने घाव घालून ठार केल्याची घटना २१ रोजी घडली. याप्रकरणी आईच्या फिर्यादीवरून मुलाविरुद्ध सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी रमाबाई अत्तरसिंग पावरा यांच्या फिर्यादीवरून माझे पती अत्तरसिंग गीलदार पावरा मुलगा बिनाज्या पावरा व सून कावीबाई, नातवंडासह राहत आहे. माझा मुलगा बिनाज्या पावरा हा त्याची पत्नी कावीबाई हिच्यासोबत माझ्या पतीचे अनैतिक संबंध आहे, असा संशय घेत होता. दरम्यान, २१ मे रोजी रात्री नऊ वाजता मुलगा बिनाज्या याने कोंबडीची भाजी बनवण्यासाठी सांगितले. मी तेल घेण्यासाठी गावात गेली. यावेळी मुलगा, सून आणि नातवंडे घरीच होते.मला माझे पती रस्त्याने भेटले असता त्यांना मी स्वयंपाकासाठी तेल घ्यायला जात असल्याचे सांगितले. त्यानंतर ते घरी निघून आले. तेल घेऊन घरी पोहोचल्यावर घरासमोर माझे पती अत्तरसिंग पावरा हे मृत पडलेले दिसले. त्यांच्या गळ्याला दुखापत होऊन
रक्तबंबाळ झाले होते. मुलगा बिनाज्या त्याच्या हातात कुऱ्हाड होती. त्यास रक्त लागलेले होते. तेव्हा मुलगा यास विचारले असता तू तुझ्या वडिलांना का मारले. तेव्हा त्याने सांगितले की, त्याचे माझी पत्नी कावीबाईबरोबर अनैतिक संबंध आहे. म्हणून मी त्यांना मारून टाकले. कावीबाई हीच कुऱ्हाडीने मारून टाकेल त्यानंतर राजाराम भोकऱ्या पावरा, रुपला पावरा, भाया पावरा यांनी मुलाच्या हातातून रक्ताने माखलेली
कुऱ्हाड हिसकावून घेतली. तेव्हा मला सून कावीबाईकडून समजले की, बीनाज्या यास बापाला मारू नको, असे सांगितले. त्यावर त्याने मला पण मारून टाकेल, अशी धमकी दिली. त्यामुळे तिथून पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, त्याने तिला पकडून आणले होते.
याप्रकरणी गावाचे पोलीस पाटील उमाजी, सून याच्यासह सांगवी पोलीस
स्टेशनला दिलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपी मुलगा बिनज्या पावरा (वय २८) याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे.
दरम्यान, घटनास्थळी उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील यांनी भेट दिली. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक अभिषेक पाटील करीत आहे.