अनैसर्गिक कृत्य करून अल्पवयीन मुलांच्या करायचा हत्या

0

डांभूर्णीसह भोकरच्या विद्यार्थ्यांच्या खुनाचाही स्थानिक गुन्हे शाखेकडून उलगडा : संशयित तरुण ताब्यात

जळगाव – यावल तालुक्यातील डांभुर्णी येथील विद्यार्थ्यांच्या हत्या प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखेने शनिवारी यश पाटील वय २६ रा. डांभुर्णी या संशयितास ताब्यात घेतले. संशयित यश हा आमिष दाखवून अल्पवयीन मुलांना सोबत निर्मनुष्य जागी अथवा शेतशिवारात घेवुन जावुन मुलांसोबत नैसर्गिक कृत्य करायचा व यानंतर हा प्रकार इतर कुणालाही कळु नये. म्हणुन अनैसर्गिक कृत्य केल्यानंतर संबंधित मुलाची निर्घुणपणे हत्या करायचा, अशी माहिती स्थानिक गुन्हे शाखेच्या चौकशीत समोर आली आहे. याच संशयिताने काही दिवसांपुर्वी जळगाव तालुक्याती भोकर येथील विद्यार्थ्यांची निर्घुण हत्या केल्याचेही निष्पन्न झाले आहे. अशाप्रकारच्या जिल्ह्यातील ईतर घटनांशी त्याचा संबंध आहे का? याचीही चौकशी सुरु आहे.

भोकरला लग्नाला आला अन् मुलाचा खुन करुन पसार

एक ते दोन महिन्यांपूर्वी भोकर येथे विद्यार्थ्याची हत्या झाल्याची घटना घडली होती.
भोकर येथील विद्यार्थी या लग्नाच्या कार्यक्रमातुन बेपत्ता झाला होता. याच लग्नाच्या कार्यक्रमासाठी संशयित यश हा भोकरला आला होता. या लग्नातून त्याने संबंधित विद्यार्थ्याला आमिष दाखवून गावाजवळ असलेल्या शेतात नेले. याठिकाणी त्याच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले. यानंतर त्याची हत्या करुन संशयित पसार झाला होता. या गुन्ह्यातील संशयितांच्या शोधार्थ तसेच माहिती करणाऱ्याला पोलीस प्रशासनाने बक्षीसही जाहीर केले होते. तसेच मारेकऱयांची रेखाचित्रही जारी करण्यात आले होते . या संशयिताचा शोध सुरू असतानाच शुक्रवारी डांभुर्णी येथे निर्घुणपणे हत्या केलेल्या विद्यार्थ्यांचा मृतदेह आढळुन आला होता.

स्थानिक गुन्हे शाखेकडुन गुन्ह्यांचा छडा

१ डांभुर्णी येथील विद्यार्थ्याच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल होताच स्थानिक गुन्हे शाखा कामाला लागले . तपासात ही दोन वर्षांपूर्वी यावल पोलिस ठाण्यात विद्यार्थ्यांचे डोळे फोडणाऱ्या तरुणाविरोधात गुन्हा दाखल असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार स्थान गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक बापु रोहम यांच्यासह पथकाने तपासाची चक्र फिरविली. त्यानुसार कोळन्हवी शेतशिवारातून पोका रणजित जाधव, नारायण पाटील, रवींद्र पाटील, अशरफ शेख, अरुण राजपूत, किशोर राठोड यांच्या पथकाने संशयितास ताब्यात घेतले.

गावातीलच मुलासोबत केले कृत्य

डांभुर्णी येथील विद्यार्थ्याची हत्या करणारा संशयित गावातीलच यश पाटील हा तरुण असल्याची खात्री झाल्यावर पथकाने शनिवारी त्याला ताब्यात घेतले. त्याची अधिकची चौकशी केली असता भोकर येथील विद्यार्थ्याचीही हत्या त्यानेच केल्याचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला संशय होता. त्यानुसार
तपासाला वेग दिल्यावर संशयित यश पाटील यानेच भोकरच्या ही विद्यार्थ्याचा खून केल्याचे निष्पन्न झाले, अशी माहिती पोलिस सूत्रांकडून मिळाली आहे. उशिरापर्यंत पोलिसांची चौकशी तसेच कारवाई सुरू होती. संशयित तरुण मनोरुग्ण असल्याचे वृत्त आहे