पुणे:‘वंचित विकास’ व ‘गमभन संस्था’ यांच्या संयुक्त विद्यामाने ‘नाटकांच्या माध्यमातून पर्यावरणची जागृती ‘ कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. अध्यक्ष, प्रमुख पाहुणे, भाषणे यांच्याशिवाय ‘निर्मळ रानवारा’ या लहान मुलांच्या मासिकाचा पर्यावरण विशेषांक प्रकाशित करण्यात आला. रसिक पुणेकरांनी भरलेले सभागृह, पर्यावरणविषयक जागृती करणारे लहान मुलांचे नाटुकले आणि मुलांच्या मासिकाचे मुलांच्याच हस्ते झालेले प्रकाशन हे या कार्यक्रमाचे प्रमुख वैशिष्ट्य ठरले.
तीन संस्थांमधील विद्यााथ्र्यांची पर्यावरण प्रकल्पावरील सहल आणि त्यांच्या लेखनातून उतरलेला पर्यावरणविषयक दृष्टिकोन यांनी हा अंक नटला आहे. या अंकाचे प्रकाशन राजलक्ष्मी सर्वेगोड, मोनू लामा, प्रणिती गाडे, सर्वम शिवशरण या मुलांच्या हस्ते करण्यात आले. या वेळी पर्यावरण संवर्धन व रक्षणची प्रतिज्ञा उपस्थितांनी घेतली.या कार्यक्रमच्या निमित्ताने महर्षी कर्वे स्त्री शिक्षण संस्थेच्या शिशुविहार प्राथमिक शाळा विद्याार्थिनींचे ‘निसर्ग राजा ऐक सांगतो!’ हे नाटुकले सादर करण्यात आले . याचे लेखन आणि दिग्दर्शन कीर्ती हवळ यांनी केले होते.
या नाटुकल्यात गायत्री जोजारे, ईशीता देवकर, ईश्वरी ढोकणे समीक्षा देशमुख, दीक्षिता खिटन, प्रतीक्षा कुलकर्णी, दिव्या गुंजोटी, संस्कृती जोगदंड या विद्याार्थिनी सहभागी झाल्या.याशिवाय ‘गुरुस्कूल’च्या मुलांच्या ‘सर्कस’ या कुमार नाट्याचे सादरीकरण मल्हार बस्मुडे, वेदान्त भान्दुर्गे, आकाश भूतकर, अनिकेत धारणे आणि तनया जाधव यांनी केले. याशिवाय ‘गुरुस्कूल’च्या मुलांच्या ‘सर्कस’ या कुमार नाट्याचे सादरीकरण मल्हार बस्मुडे, वेदान्त भान्दुर्गे, आकाश भूतकर, अनिकेत धारणे आणि तनया जाधव यांनी केले. याचे लेखन आणि दिग्दर्शन देवदत्त पाठक यांनी केले होते.तर या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे विकास चाफेकर ल. म कडू ,ज्योती जोशी ,सुप्रिया कुलकर्णी ,सरोज टोळे आदी मान्यवर उपस्थित होते.