अनोखे अवयवदान, रक्तदान कवीसंमेलन

0

जळगाव । सेवाभावी संस्था मुक्ती फाऊंडेशन व इंडियन रेडक्रॉस सोसायटी जिल्हा पत्रकार संघाच्या विद्यमाने अवयवदान, रक्तदान या विषयावर कवी संमेलन उत्साहात नुकतेच झाले. जिल्ह्यासह राज्यातून तसेच मध्य प्रदेश येथूनही कवी मंडळी स्वयंस्फूर्त उपस्थित होते. कार्यक्रमाचे उद्घाटन अवयवदान, नेत्रदान संकल्प पत्र भरुन करण्यात आले. जिवंतपणी रक्तदान, अवयवदान तर मृत्यूपश्‍चात देहदान-नेत्रदान, जीवन के साथ भी जीवन के बाद भी रहो अपनो के साथ! त्याचप्रमाणे मृत्यूनंतर निर्जिव देह.. जळे राख… दफने माटी अशा आशयावर कवींनी कवीता सादर केल्या.

यांचा होता संमेलनात सहभाग
अवयवदान, रक्तदान कवी संमेलनाबाबत मुकुंद गोसावी यांनी प्रास्ताविक करत समाजात अवयवदान-रक्तदान चळवळ जोमाने उभारावी असे आवाहन करत या विषयावर शास्त्रीय माहिती दिली. इंडियन रेडक्रॉस सोसायटीचे उपाध्यक्ष गनीभाई मेमन यांनी रेडक्रॉसच्या विविध उपक्रमांची माहिती दिली. कवी अशोक शिंदे, रेडक्रॉसचे सचिव विनोद बियाणी यांनी मानपत्र देत कवींच्या गौरव केला आभार राजेश यावलकर यांनी मांडले. या कवी संमेलनात घन:श्याम दिगंबर भुते, अनिकुमार चौधरी, तुषार वाघुळदे, भिमराव अर्जुन बार्‍हे, गोविंद देवरे, राहुल महिपतराव तायडे, एम.पी. काशीनाथ पवार, रा.ना. कापुरे, मनोज सपकाळे, एस.पी. गणेशकर, अजय तायडे, किशोर नेवे, अशोक पारधे, प्रा.डॉ. आशिष जाधव, रोहित पाटील, प्रकाश दाभाडे, प्रा. प्रसाद नेवे, अजय माळी, रोहन शर्मा आदींच्या जनजागृतीपर विशेष कवीता सादर झाल्या.