अनोख्या रक्षाबंधनाचा सोहळा पडला पार

0

सोमवारी आलेल्या रक्षाबंधनाच्या निमित्ताने अनेक शालेय विद्यार्थी – विद्यार्थीनिनी निरनिराळय प्रकारे हा सण साजरा करून त्यात रंगत आणली. शाळांमध्ये रक्षाबंधन उत्साहाच्या वातावरणात साजरे करण्यात आले. बहीण आकर्षक राखी केव्हा आपल्या हाताला बांधते असे लहान मुलांना होत असते त्यामुळे आतुरतेने वाट पाहणाऱ्या या मुलांनी आज हातभर राख्या बांधल्या. टिटवाळा नजीक खडवली येथील जी.के.एस. कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय खडवली येथील सेवा योजने मार्फत गुरूवारी आदिवासी आश्रम शाळा व पसायदान बालभवन खडवली या ठिकाणी जाऊन अगळा वेगळा रक्षाबंधनाचा कार्यक्रम पार पाडला. जी.के.एस. महाविद्यालयातील विद्यार्थिनी , स्वयंसेवक व प्राध्यापक वर्ग. अशाच प्रकारे बुधवारी खडवली येथील अनाथ बालभवन व आदिवासी आश्रम शाळा येथे जाऊन तेथील शेकडो विद्यार्थ्यां सोबत रक्षाबंधन सण साजरा केला राखी बरोबर त्यांना खाऊ देखील वाटप करण्यात आले. याच वेळी उपस्थित मान्यवर व बालभवन व आश्रम शाळेतील शिक्षकांना प्राध्यापिका यांनी राख्या बांधल्या. यावेळी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शाळेचे प्राध्यापक आणि आश्रम शाळेतील शिक्षक यांचे विशेष सहकार्य मिळाले.

दुसरीकडे डोंबिवलीतील विद्यार्थीनिनी `झाडे लावा, झाडे जगवा असे संदेश देत सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनीनी वृक्षांना राखी बांधून वृक्षसंवर्धनाची प्रतीक्षा घेतली. डोंबिवलीत प्रथमच अश्या प्रकारचे अनोखे रक्षाबंधन केले. डोंबिवली पूर्वेकडील चिऊ पार्क येथे सेंट जोसेफ शाळेतील विद्यार्थिनीनी राख्या बांधल्या. यावेळी शाळेच्या शिक्षिका आणि अन्य मान्यवर उपस्थित होते. यावेळी विद्यार्थ्यांनी वृक्षसंवर्धनाची प्रतिज्ञा घेतली. वृक्षांनीच आता मानवांचे रक्षण करण्याची वेळ आली आहे.झाडांची निगा राखण्याची गरज असल्याचे यावेळी शिक्षिका अनघा दामले यांनी सांगितले. काही दिवसांपूर्वी इनरव्हील क्लब ऑफ डोंबिवली पश्चिमच्या वतीने या शाळेत विद्यार्थ्यांना `निसर्ग व मी` असा विषयावर निबंध स्पर्धा घेण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. यावेळी विजेत्या विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस देण्यात आली. किन्हवली येथेही शहा चंदुलाल सरूपचंद विद्यालयात भारतीय संस्कृतीत पवित्र-पावन,बहीण-भावाच्या प्रेमाचे प्रतीक असलेला’रक्षाबंधन’ हा उत्सव मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विद्यालयातील विद्यार्थिनींनी आपल्या वर्गातील मुलांना आरती ओवाळून औक्षण केले व त्यांना राख्या बांधल्या. या कार्यक्रमास शहा विद्यालयाचे मुख्याध्यापक शिक्षक उपस्थित होते.