अनोळखी इसमाचा जळगावात रेल्वेच्या धडकेने मृत्यू

जळगाव : शहरातील शिवकॉलनी उड्डाणपूल परीसरात रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाला. ही घटना गुरुवारी घडली. मयत व्यक्तींची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे.

रामनंद नगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद
जळगाव शहरातील शिवकॉलनी उड्डाणपुलाजवळ अप रेल्वेलाईनवर खंबा क्रमांक 417 /20- 18 जवळ रेल्वेच्या धडकेत अनोळखी व्यक्तीचा मृत्यू झाल्याची माहिती शिरसोली येथील स्टेशन मास्तर कमलेश सिन्हा यांनी रामानंदनगर पोलिसांना कळविली. त्यानुसार रामानंदनगर पोलीस ठाण्याचे पोलीस नाईक जितेंद्र तांबडे पोलीस कॉन्स्टेबल ईकबाल पिंजारी पंकज पाटील या कर्मचार्‍यांनी घटनास्थळ गाठून मृतदेह जिल्हा रुग्णालयात हलविला. याप्रकरणी जळगाव रेल्वे स्टेशनची उपप्रबंधक यांच्या खबरीवरून रामानंदनगर पोलिसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे हे करीत आहेत. मयताचे वय अंदाजे 45 ते 50 वर्ष असुन मजबूत जाडसर बांधा रंग गोरा उंची 160 सेंटीमीटर तर अंगात निळी जीन्स पँट व पांढर्‍या रंगाचा नक्षी असलेला शर्ट तसेच पांढरा बनियान व तपकिरी रंगाची अन्डर पँट असे मयताचे वर्णन आहे. घटनास्थळी मयताची स्पार्क कंपनीची चप्पल तसेच पांढरा हातरुमाल मिळून आला आहे. या वर्णनानुसार मयताची ओळख पटविण्याचे आवाहन रामानंदनगर पोलिसांनी केले आहे. कोणालाही मयताची ओळख पटल्यास त्यांनी रामानंदनगर पोलिसांशी संपर्क साधावा असेही कळविण्यात आले आहे.