जळगाव। शिरसोली रेल्वे लाईनवर रेल्वेखाली आल्याने अनोळखी पुरुषाचा मृत्यू झाल्याची घटना घडली. सकाळी साडेतीनला रेल्वेच्या कर्मचार्यांना शिरसोली येथील रेल्वेलाईनवर हा मृतदेह आढळला.
त्यानंतर कर्मचार्यांनी अनोळखी इसमास जिल्हा सामान्य रूग्णालयात उपचारार्थ नेले. परंतू वैद्यकीय अधिकार्यांनी त्याची तपासणी केल्यानंतर अनोळखी इसमास मृत घोषित केले. अखेर याबाबत रेल्वे विभागाचे उपप्रबंधक एस. कुलकर्णी यांच्या फिर्यादीवरून तालुका पोलिस ठाण्यात अकस्मित मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.