जळगाव : बालाजी पेठ परिसरात मयत स्थितीत 40 वर्षीय पुरूषाचा मृतदेह आढळून आला. रविवारी रात्री त्या पुरूषाच्या मृतदेहास जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले असून याबाबत शनिपेठ पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
रविवारी रात्री बालाजी पेठ परिसरात एका अनोळखी पुरूष मयत स्थितीत आढळला. त्यास 108 रूग्णवाहितेकून जिल्हा रूग्णालयात दाखल करण्यात आले. याबाबत सीएमओ डॉ. प्राची सुरतवाला यांच्या खबरीवरून अकस्मात मृत्यूच नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, मयत पुरषाच्या हातावर जयभीम असे नाव गोंदलेले असून सदर इसमासाच्या नातेवाईकांनी शनिपेठ पोलीसांशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. याप्रकरणी तपास मोतीलाल पाटील व रविंद्र सोनवणे हे करीत आहेत.