अनोळखी भिकार्‍याचा मृत्यू

0

भुसावळ: रेल्वे लोहमार्ग पोलीस ठाण्यामागील चर्चजवळील एका भिंतीच्या आडोशाला 50 ते 55 वर्षीय भिकार्‍याचा आजारपणामुळे बुधवारी दुपारी मृत्यू झाला. गेल्या काही दिवसांपासून हा भिकारी या भागातच झोपत असल्याने आजाराने मरण पावला असल्याचा अंदाज व्यक्त होत आहे. जितेंद्र गणपत आव्हाड यांनी या प्रकरणी बाजारपेठ पोलिसात खबर दिल्यावरून अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.