भुसावळ- चाळीसगाव रेल्वे स्थानकावरील प्लॅटफार्म क्रमांक तीनवर अनोळखी महिलेचा आजाराने मृत्यू झाल्याची घटना रोजी घडली. रंग निमगोरा, बांधा सडपातळ, उंची 4.8 फूट, चेहरा लांबट, केस काळे, उजाव्या अस्पष्ट गोंदलेले तर अंगात गुलाबी रंगाचे ब्लाऊज, भगव्या पिवळ्या रंगाचे स्वेटर, पोपटी रंगाची साडी असे वर्णन आहे. ओळख पटत असल्यास चाळीसगाव लोहमार्गचे हवालदार प्रकाश चौधरी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.