अनोळखी व्यक्तीचा मृतदेह आढळल्याने परीसरात खळबळ

0

अडावद। अडावद-कमळगाव रस्त्यालगत असलेल्या रानमळा शेतशिवारात अनोळखी इसमाचा मृतदेह आढळून आला. आज सकाळी 9 वाजेनंतर ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. अडावद-कमळगाव रस्त्यावरील शेतशिवारामधील कापसाच्या शेतात 30 वर्षीय अनोळखी इसमाचा दुर्गंधी येत असलेला मृतदेह आढळून आला.

शुक्रवार 4 ऑगस्ट रोजी सकाळी 9 वाजेच्या सुमारास ही घटना उघडकीस आल्याने परिसरात एकच खळबळ उडाली. ही वार्ता गावात वार्‍यासारखी पसरताच ग्रामस्थांनी धाव घेतल्याने बघ्यांची गर्दी झाली. याबाबत संजय नवल महाजन यांनी दिलेल्या खबरीवरुन अडावद पोलीस स्टेशनला अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार रविंद्र साळी हे करित आहे.