जळगाव – शहरापासून जवळ असलेल्या आसोदा रेल्वे गेटजवळ 35 ते 40 वर्षीय अनोळखी व्यक्तीने धावत्या रेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना घडली असून परीसरात खळबळ उडाली आहे. याबाबत तालुका पोलीसात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, आसोदा रेल्वे गेटजवळील खंबा क्रमांक 422/7-9 दरम्यान एका 35-40 वर्षे वयोगटातील व्यक्तीने धावत्यारेल्वेखाली येवून आत्महत्या केल्याची घटना सकाळी 6.15 वाजेच्या सुमारास उघडकीस आली. स्टेशन उपप्रबंधक एम.के.शर्मा यांच्या खबरीवरून तालुका पोलीस स्टेशनला आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. याबाब पुढील तपास विजय पाटील करीत आहे.