भुसावळ : अन्नातून विषबाधा झाल्याने नऊ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला. मोगली राजू राठोड (9, रा.निंबापती, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद) असे मयत बालकाचे नाव आहे. बालक अत्यवस्थ झाल्यानंतर त्यास गोदावरी रुग्णालयात हलवण्यात आले होते. मंगळवारी सकाळी 10 वाजेच्या सुमारास या बालकाचा मृत्यू झाला.