नवी दिल्ली-राफेल कराराच्या चौकशीसाठी जेपीसी नेमण्यात यावी यासह इतर मागणीसाठी लोकसभेत गदारोळ झाल्याने कामकाज दुपारपर्यंत स्थगित करण्यात आले. या गदारोळात लोकसभा अध्यक्ष सुमित्रा महाजन यांनी तेलुगू देशम पार्टी आणि ऑल इंडिया अन्ना द्रविड़ मुनेत्र कड़गमच्या चार खासदारांना निलंबित केले आहे.
आंध्रप्रदेशला विशेष राज्याचा दर्जा द्यावा तसेच एडीएमकेच्या आमदारांनी कर्नाटकात कावेरी नदीवर बांधण्यात येत असलेल्या बंधाऱ्याचे काम स्थगित करण्यात यावे अशी मागणी केली. यासाठी त्यांनी लोकसभेत गोंधळ घातला. त्यामुळे लोकसभा अध्यक्षा सुमित्रा महाजन यांनी त्यांना निलंबित केले. मागील आठवड्यात अन्नाद्रमुक आणि तेदेपाचे ४५ खासदार निलंबित करण्यात आले आहे.