अन्यथा आत्महत्त्येची परवानगी द्या

0

जळगाव । मी सायबर क्राईमचा बळी ठरला असून माझ्यावर दाखल करण्यात आलेले सर्व खोट्या गुन्ह्यांची सीआयडी किंवा सीबीआय चौकशी करा अन्यथा आम्हाला सामुहिक आत्महत्या करण्यात परवानगी द्या, अशी मागणी सोमवारी माहिती अधिकार कार्यकर्ता दिपककुमार गुप्ता यांनी पत्रपरिषदेत केली. यावेळी ते संपूर्ण कुटूंबियांसह पत्रपरिषदेत उपस्थित होते. दरम्यान, गेल्या चार महिने वेगवेगळ्या गुन्ह्यात अडकल्यानंतर अखेर जामीनावर सुटका होताच त्यांनी सोमवारी त्यांच्यासोबत घडलेल्या संपूर्ण प्रकरणाची माहिती देण्यासाठी व त्यांच्यावर दाखल करण्यात आलेल्या खोट्या गुन्ह्यांची माहिती देण्यासाठी पत्रकार परिषदेत आयोजित केली होती.

चोपडा येथून मी अपंग असल्याचे सांगून घेतले सिम
दीपक गुप्ता यांची 16 जुलै रोजी जामिनावर सुटका करण्यात आली आहे. महिला लोकप्रतिनिधींना अश्‍लील संदेश पाठविल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. यासंदर्भात सोमवार रोजी घेतलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देतांना एक व्यक्तीने दीपक गुप्तांचा व्यवसाय असून ते अपंग असल्याने सीम घेण्यास येवू शकत नाही म्हणून चोपडा येथून कोणीतरी सीम कार्ड घेतले. माझ्या मोबाईलचा इएमआय क्रमांक क्लोन केला गेला किंवा कॉपी करण्यात आला. माझ्या घरा जवळील मोबाईल टावरचे लोकेशन घेवून एकाच पध्दतीचे फक्त नाव बदलून अश्‍लील संदेश पाठविण्यात आले. हे संगनमताने माझ्या विरूध्द करण्यात आलेले षडयंत्र आहे. दरम्यान, मला व्हिलेपार्ले पोलिस स्टेशन, नवी मुंबई क्राईम ब्रॉन्च तसेच पुणे व नाशिक येथील पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर प्रकरणाची संपूर्ण चौकशी करण्यात आली. परंतू मी काही केलेले नसल्याचेच पुरावे समोर आल्याचे गुप्ता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. पोलिस प्रशासन व काही व्यक्तींकडून मला अडकविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप त्यांनी केला.

आधारकार्डही बनवले ‘डुप्लिकेट’
मी अनेक वर्षांपासून लोकहितासाठी माहितीच्या अधिकाराचा वापर करत आहे. माझे काम काही लोकांना पसंत नसल्याने हे षडयंत्र रचण्यात आले. माझे खोटे आधार कार्ड सुध्दा बनविण्यात आले आहे. त्यावर असलेले छायाचित्र मिक्सींग करून बनविण्यात आले आहे. तसेच त्यावरील पत्ता देखील खोटा आहे. युआयडीच्या वैधता तपासणीत हे आधारकार्ड नकली असल्याचे उघड झाले आहे. तर मला चार महिने खोट्या गुन्ह्यात फसवून चार महिने अडकवून ठेवले. मात्र, पोलिसांनी केलेल्या चौकशीत मात्र ते मी केले नसल्याचे समोर आले असून त्याबाबतचे पुरावे देखील आहेत, असे देखील त्यांनी माहिती देतांना पत्रकारांना सांगितले आहे. यातच शहरात उमी आवाज उठविल्यानंतर महिला अनेक पोलिस अधिकार्‍यांकडून धमकविण्यात आले असून त्यांच्या तक्रारी देखील मी महासचालकांकडे केल्या आहेत. जनतेसाठी आवाज उठवतांना माझा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत असल्योच त्यांनी सांगितले.

मला फसविण्याचा प्रयत्न
जळगाव शहरातील अवैध धंद्यांबाबत मी आवाज उठविल्याने मी शहरातच राहु नये यासाठी नियोजन करून अडकविण्यात आले असल्याचा आरोप त्यांनी केला. तसेच त्यांच्यावर असलेल्या सर्व आरोपांची सीआयडी मार्फत चौकशी करण्यात यावी यासाठी पोलीस महासंचालकांना पत्र दिले असल्याचे त्यांनी सांगीतले. जर तक्रारींची सीआयडी चौकशी होणार नसेल तर कुटुंबासह सामुहिक आत्महत्या करण्याची परवानगी द्या अशी मागणी त्यांनी केली. यातच मला खोट्या गुन्ह्यात अडकविल्यानंतर चार महिने मला पोलिस ठाण्यांमध्ये काढावे लागल्याने घरातील कर्ताच नसल्याने पत्नी मुलींनी कसे तरी घर चालविले होते असे देखील त्यांनी पत्रकार परिषदेत सांगताच ते भावूक झालेत. तर जनतेने साथ द्यावी अशी मागणीही त्यांनी यावेळी केली.