रांजणगाव । डीजेवर पूर्णतः बंदी घालण्यात आली असून गणेश मंडळानी मिरवणुकीसाठी पारंपारीक वाद्याचा वापर करावा. रस्ता, चौकात मंडप खोदू नये. त्याचप्रमाणे बळजबरीने वर्गणी गोळा करू नये, अन्यथा तक्रार आल्यास गुन्हे दाखल केले जातील, असा इशारा अप्पर पोलिस अधीक्षक डॉ. संदीप पखाले यांनी दिला आहे.
सर्व सामान्य नागरिकांना त्रास होणार नाही. याचे कार्यकर्त्यांनी भान ठेवावे, असे आवाहन पखाले यांनी केले. रांजणगाव गणपती देवस्थानचा भाद्रपद महोत्सव व गणेश चतुर्थीचे औचित्य साधून रांजणगाव व शिक्रापूर पोलिस स्टेशन अंतर्गत येत गावांमधील गणेश मंडळाच्या बैठकीचे आयोजन केले होते. यावेळी ते बोलत होते. गणेश मंडळानी सामाजिक बांधिलकी जपत मंडळ्याच्या वतीने सामाजिक उपक्रम राबवावेत, असे आवाहन यावेळी करण्यात आले. पंचायत समिती सदस्य विक्रम पाचुंदकर, सरपंच सुरेखा लांडे, उपसरपंच नवनाथ लांडे, देवस्थानचे डॉ. संतोष दुंडे, उपाध्यक्ष विजयराज दरेकर, श्रीकांत पाचुंदकर, अंकुश लवांडे, राजेश लांडे, दत्तात्रय पाचुंदकर, नानासाहेब लांडे, दौड विभागाचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे, रांजणगाव पोलीस स्टेशनचे पोलिस निरीक्षक अमरनाथ वाघमोडे याप्रसंगी उपस्थित होते.