…अन्यथा गौरक्षकांची खैर नाही

0

लखनौ : उत्तर प्रदेश पोलिस महासंचालकपदाची सुत्रे हाती घेतल्यानंतर सुलखान सिंग यांनी गुन्हेगार, कायदा मोडणारे राजकारणी आणि स्वयंघोषित गौरक्षक यांना कडक संदेश दिला आहे. थोडक्यात या सर्वांची आता खैर नसल्याचे सिंग यांनी म्हटले आहे. रेड लाईन क्रॉस केल्यास कुणालाही सोडले जाणार नाही.

उत्तर प्रदेशातून गंडागर्दी नष्ट केली जाईल, असेही ते म्हणाले. जावेद अहमद यांच्याकडून सुलखान सिंग यांनी शनिवारी उत्तर प्रदेश पोलिस महासंचालक पदाचा पदभार स्वीकारला यावेळी ते बोलत होते. ते म्हणाले, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी स्पष्ट आदेश दिले आहेत की, जो कुणी कायदा हातात घेण्याचा प्रयत्न करेल त्याच्यावर योग्य कारवाई झालीच पाहिजे. त्यामुळे आता कुठल्याही पक्षाचा गुन्हेगार असला तरी येथून पुढे त्याच्यावर सक्त कारवाई केली जाईल.