…अन्यथा 1 ऑगस्टपासुन सेना स्टाईल आंदोलन

0

पाचोर्‍यात शिवसेनेचा इशारा
पाचोरा – महाराष्ट्रात मराठा समाज मोठ्या संख्येने असून विविध मागण्यासाठी लोकशाही पद्धतीने मोठे मोर्चे शांततेत पार पडले, मात्र भाजप सरकारने या मराठा बांधवांच्या मागण्याकडे दुर्लक्ष केले असून मराठा आरक्षणा आता तातडीने जाहीर करावे, अन्यथा पाचोरा शिवसेना व युवासेनातर्फे सेना स्टाईलने आंदोलन छेडण्यात येईल व 1 ऑगस्ट पासुन आमरण उपोषण पुकारणार असल्याचा इशारा शिवसेनेतर्फे देण्यात आला आहे. शिवसेना शहरप्रमुख किशोर बारवकर व पप्पुदादा राजपुत आणि अ‍ॅड .दिपक पाटील यांच्यासह शिवसैनिकांनी आणि युवासैनिकांनी सकल मराठा समाज बांधवांकडुन सुरू असलेल्या ठिय्या आंदोलनाला पाठिंबा देत तासभर ठिय्या आंदोलनात सहभाग नोंदविला.

विविध मागण्या मांडल्या
निवेदनात म्हटले आहे की, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाच्या मागण्यासंदर्भात मराठा बांधवांशी चर्चा न करता व त्यासाठी तत्परता न दाखवता हे आरक्षण फक्त न्यायालयच देऊ शकते हे विधान करून समाज बांधवांच्या भावना दुखवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी करण्यात आला. याचा उद्रेक संपूर्ण महाराष्ट्रात झाला आणि त्याचाच एक अविभाज्य भाग म्हणून काकासाहेब शिंदे यांना या मागण्यांसाठी हुतात्म्य पत्करावे लागले. काकासाहेब शिंदे यांच्या कुटुंबियांना 50 लाख रूपयांची मदत मिळावी, शासकीय नोकरीत समाविष्ट करून घ्यावे, अशी मागणी करण्यात आली. यावेळी शिवसैनिकांनी जोरदार घोषणांनी परीसर दणदणादुण सोडला. यावेळी कुणीही या मोर्च्यांचे राजकीय श्रेय घेऊ नये व मराठा समाजाविषयी मागण्या मान्यतेसाठी ज्यांना पाठींबा द्यायचा असेल त्यांनी कुणाचेही दबावात न येता उघडपणे येऊन पाठींबा द्यावा, असे पप्पुदादा राजपुत यांनी यावेळी सांगितले.