अन्यना पांडेचा जलवा, फराह खानचा सल्ला

0

आपल्या बिनधास्त अंदाजासाठी बॉलिवूडची प्रसिद्ध कोरिओग्राफर क्वीन खान म्हणजेच फराह खान चर्चेत असते. ती अभिनेता चंकी पांडेच्या मुलीवर केलेल्या कमेंटमुळे सध्या चर्चेत आहे. अनेक स्टार किड्स इन्स्टाग्रामसारख्या सोशल मीडियावर आपला जलवा दाखवत असतात. त्यांना चर्चेत कसे राहायचे हे चांगलेच ठाऊक असून नव्या नवेली, सुहाना खान, जान्हवी या स्टार किड्सच्या यादीत आता अभिनेता चंकी पांडेची मुलगी अनन्या पांडेही सामील झाली आहे. इन्स्टाग्रामवर अनन्या फारच सक्रीय असते.

काही दिवसांपूर्वी इन्स्टाग्रामवर अनन्याची आई भावना पांडेने एक फोटो पोस्ट केला होता, फराह खानने ज्यावर अजब कमेंट करत म्हटले की, अनन्या तू जर तुझी डीएनए टेस्ट करून घे प्लीज. चंकीची मुलगी असूनही ती फार सुंदर आहे. अर्थात फराहने ही कमेंट थट्टेतच केली होती. चंकी पांडेच्या मुलीच्या सौंदर्याची भुरळ तिला पडल्याचे स्पष्ट जाणवत असल्यामुळेच ती अनन्याचे कौतुकच करत आहे.