…अन् चिमुकलीची जळगावात सुटका!

0

जळगाव। राजस्थान राज्यातील सदूल तालुक्यातील अमरगढ शहरातील 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला एकाने आमिष दाखवून अपहरण केले होते. त्या चिमुकलीची अखेर नऊ दिवसानंतर सुरत-भुसावळ पँसेजरमधून प्रवास करीत असतांना अपहरणकर्त्याकडून नागरिकांनी सुटका केली. मात्र, अपहरणकर्ता इसम हा फरार होण्यास यशस्वी झाला. यानंतर नागरिकांनी भुसावळ, जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती दिल्यानंतर जळगाव रेल्वे स्थानकावर गाडी आल्यानंतर नागरिकांनी चिमुकलीला पोलिसांच्या ताब्यात दिले. पोलिसांनी तात्काळ तिच्या काकांना संपर्क साधल्यानंतर चिमुकलीच्या काकांनी शनिवारी जळगाव गाठत पुतणीला पोलिसांच्या ताब्यातून घेतले.

यापूर्वीही दोन मुलांचे अपहरण
दिलीप कुमार या तरूणाने या पूर्वी देखील सदूल शहरातील 35 किमी अंतरावर असलेल्या एका गावातून दोन मुलांना अपहरण केले होते. यानंतर त्याला नांदेड येथे पोलिसांनी अटक केली होती. त्याच्याविरूध्द वेगवेगळ्या पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल आहेत. परंतू आता पुन्हा चिमुकलीचे अपहरण केल्याने एकच खळबळ उडाली आहे. तसेच दिलीपकुमार याचा पोलिस शोध घेत आहेत.

बाजारा घेवून जाता सांगून चिमुकलीला नेले पळवून
पंधरा ते वीस दिवसांपूर्वी सदूल या गावातील अमरगढ शहरात राहत असलेल्या चिमुकलीच्या कुटूंबियांशी दिलीपकुमार भागाराम (वय-32. पूर्ण नाव माहित नाही) या तरूणाने ओळख-परिचय वाढविण्याचा प्रयत्न केला. ओळख बनविल्यानंतर तो दोन दिवस त्यांच्याचकडे राहिला. यानंतर चक्क त्याने तेथील तेरा वर्षीय चिमुकलीला मी तुझा मामा आहे. आपण बाहेर फिरायला जावू असे आमिष दाखवून तिला घराबाहेर नेले. यावेळी तिचा मोठा भाऊ देखील त्याच्या सोबत होता. यानंतर चिमुकलीच्या भावाला शहरातील बाजारात सोडून दिपीलकुमार हा त्या चिमुकली पळवून घेवून गेला. मुलगी घरी परलीच नसल्याने अखेर कुटूंबियांनी सदूल शहरातील पोलिस ठाण्यात दिलीप नामक इसमाने मुलीचे अपहरण करून घेवून गेल्याची फिर्यादी दिली. त्यानुसार दिलीपकुमार या संशयिताविरूध्द याच्याविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला होता.

दिल्ली, मध्य मध्यप्रदेशात फिरवले
दिलीपकुमार याने अल्पवयीन मुलीचे अपहरण केल्यानंतर तिला दिल्ली येथे नेले. चिमुकलीने घरी जाण्याचा तगादा लावल्यानंतर तो तिला घरी घेवून जाईल असा बहाणा बनवून टाळाटाळ करायचा. तर तिला गुरूद्वारामधून मिळणार्‍या जेवनातून तो दिवसातून एकच दा जेवनाचा दायचा. घरी जाण्याचा दगादा लावला तर तिला दम भरायचा व मारहाण करायचा. यानंतर त्याने चिमुकलीला मध्यप्रदेश राज्यात नेले. यानंतर तिला त्या ठिकाणी सोबत घेवून फिरवा-फिरव केली. या दरम्यान, कुटूंबियांनाही तरूण हा अशाच प्रकारे मुलांचे अपहरण करत असल्याची माहिती मिळाली. यापूर्वी त्याला नांदेड येथे पोलिसांनी अटक केली होती. त्यामुळे चिमुकलीच्या कुटूंबियांनी नांदेड येथे जावून आपल्या मुलीचा व अपहरण कर्त्याचा शोध घेण्यात सुरूवात केली.

नेतलेकरांनी चिमुकलीला पोलिसांनी केले स्वाधीन
भुसावळ पोलीसांनी जळगाव रेल्वे पोलिसांना माहिती दिली. पोलीस उपनिरीक्षक एस.बी. पडघान, जळगाव रेल्वे पोलिस कर्मचारी जगन्नाथ सरोदे, योगेश चौधरी, हिरालाल चौधरी, रामराव इंगळे व महिला पोलिस विजया जाधव यांनी रात्री 8 वाजता जळगाव रेल्वे पोलिस स्टेशन गाठले. यानंतर संजय नेतलेकर यांच्याशी पोलिसांनी संपर्क साधला व त्या चिमुकलीला ताब्यात घेतले. यानंतर तिला रात्रीच बालनिरीक्षण गृहात पाठविण्यात आले. रेल्वे पोलिसांनी चिमुकलीच्या काकांशी संपर्क साधून त्यांना जळगावात चिमुकली सापडल्याची माहिती दिली. यानंतर आज शनिवारी चिमुकलीचे काका गुरमितसिंग व राजु यांनी जळगाव गाठत पोलिसांच्या ताब्यातून पुतणीला घेतले. यावेळी अमरगढ गावाचे सरपंच कुलदिपसिंग हे देखील त्यांच्यासोबत आले होते. दरम्यान, दिलीपसिंग याच्याविरूध्द वेगवेगळया पोलिस ठाण्यात अहपरणाचे गुन्हे दाखल आहेत. तर यापूर्वी देखील त्याने दोन बालकांना पळवून नेले होते अशी माहिती पोलिसांनी दिली.
रेल्वेत केली मारहाण अन् चिकुकलीने सांगितली हकीकत सायंकाळची सुरत-भुसावळ पँसेजरमधून 24 रोजी शुक्रवारी दिलीप हा चिमुकलीला घेवून प्रवास करत होता. परंतू, चिमुलीने घरी जाण्याचा तगादा लावल्याने दिलीप याने तिला दम भरत तिला मारहाण करण्यास सुरूवात केली. यातच समोर बसलेल्या प्रवासी वृध्दाने व संजय नेतलेकर यांनी चिमूकलीला तरूण मारहाण करीत असल्याचे पाहिले. यानंतर त्या वृध्दाने चिमुकलीला बोलवून हकीकत विचारली असता तीने हा इसम अपहरण करून घेवून जात असल्याचे सांगितले. वृध्दाने व संजय नेतलेकर यांनी दिलीप यास पकडून त्याला पोलिसांच्या स्वाधीन करू असा दम भरला. परंतू विखरनला रेल्वे थांबल्यानंतर मात्र दिलीप हा त्याच्या तावडीतून सुटून फरार झाला. संजय नेतलेकर यांच्या मोबाईलवरून चिमुकलीने तिच्या काकांना फोन लावला व कुठे असल्याची माहिती दिली. तिच्या काकांनी सदूल पोलिसांना माहिती देताच पोलिसांनी भुसावळ पोलिसांची संपर्क साधून अपहरण झालेली चिमुकली सुरत भुसावळ पँसेजरमध्ये असल्याची माहिती दिली.