शिमला । पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नुकताच शिमल्याचा दौरा केला. या दौर्यात झालेल्या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या खुर्चीवर बसले होते. ती खुर्ची चोरीला गेली आहे. त्यामुळे एकच खळबळ उडाली असून मोदींची खुर्ची चोरीला गेल्यामुळे पोलिसांची चिंता वाढली आहे.
सुरुवातीला पोलिसांनी या प्रकरणाकडे जास्त गांभिर्याने बघितले नाही. मात्र चार दिवस उलटून गेल्यावरही जेव्हा खुर्ची दिसत नव्हती तेव्हा मात्र पोलिसांना या घटनेचे गांभीर्य कळाले. खुर्ची चोरीला गेल्यामुळे आरोपीविरोधात एफआयआर दाखल करण्याची मागणी आता होत आहे. यासंदर्भात शिमल्याच्या पोलीस अधीक्षकांना पत्र लिहिण्यात आले असून आरोपींवर कठोर कारवाई करण्याची मागणी यात करण्यात आली आहे. 27 एप्रिलला रिज मैदानावर मोदीची रॅली निघाली होती. या रॅलीमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी ज्या खुर्चीवर बसले होते ती खुर्ची गेल्या चार दिवसांपासून हरवली आहे. ज्या फर्निचरच्या दुकानातून ती खुर्ची आणली गेली, तिथं ही खुर्ची परत गेलेली नाही. लोअर बाजारातून 11 खुर्ची मागवण्यात आल्या होत्या. त्यातली नेमकी पंतप्रधान नरेंद्र मोदी बसण्यासाठी वापरलेली खुर्ची चोरीला गेली आहे. दुसरीकडे भाजप नेत्यांचे म्हणणे आहे की ही खुर्ची पंतप्रधानाचा एखादा फॅन घेऊन गेला आहे. मात्र तरीदेखील खुर्ची चोरीला जाणे ही एक गंभीर घटना आहे.