जळगाव। शहरातील पंचमुखी हनुमान मंदिराजवळ असलेल्या श्रीकृष्ण पेट्रोल पंपावर तीस रुपयांचे पेट्रोल खरेदी केल्यावर ते कमी-जात प्रमाणात असल्याचे आढळुन आल्यानंतर दुपारी ग्राहकांनी चांगलाच गोंधळ घातला. दरम्यान, पांडे डेअरी चौकातुन सारख्याच बॉटल मध्ये तीस रुपयांचे पेट्रोल घेतल्यावर निम्मा फरक जाणवल्याने ग्राहकांनी तक्रार करुन वजनमापे निरीक्षकांना बोलावण्यात आले. वजनमापे निरीक्षकांनी पाच लिटर पेट्रोलचे आकारमान मोजल्यावर त्यातही पेट्रोल कमी भरल्याने अखेर पंपाचे मशील सिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. नेहमीपासुन तक्रारी असलेल्या या पंपावर सर्किट चिप बसवल्याचा आरोप ग्राहकांनी यावेळी केला.
तीन बाटल्यात चक्क कमी-जास्त पेट्रोल
पंचमुखी हनुमानमंदिर परिसरातील श्रीकृष्प पेट्रोलपंपावर आज दुपारी इरफान शेख खफ्फार, हा गॅरेज वाला पेट्रोल भरण्यासाठी गेला. याच वेळेच विनोद आटो गॅरेजवरील मेकॅनीक आणि इतर एक वाहन धारक पराग कोचुरे पेट्रोल भरण्यासाठी आले होते. तिस रुपयांचे पेट्रोल घेतल्यावर ते निम्मे कमी असल्याची शंका आल्याने लगेच पांडे डेअरी चौकातील दुसर्या पंपावरुन तीस रुपयांचे पेट्रोल मागवण्यात आले, ते पेट्रोल या पंपापेक्षा दुप्पट होते. अखेर ग्राहकांनीच एकी करीत तक्रारीचा सुर आवळला. घडल्या प्रकाराची माहिती झाल्यावर वृत्तपत्रांचे प्रतिनीधीही धडकले. पराग कोचुरे यांनी तक्रार रितसर संबधीत कंपनीच्या वरीष्ठांना फोनवर तक्रार केल्यावर ते नागपुरला असल्याचे त्यांनी सांगीतले. परिणामी वजनमापे कार्यालयास कळवण्यात आले.
वजनमापे निरीक्षक सी.डी.पालीवाल घटना स्थळी दाखल झाल्यावर ग्राहकांनी त्यांना घडला प्रकार सांगीतला. त्यांनी सर्वांसमक्ष पाच लिटर पेट्रोल मापात काढण्यास सांगीतले त्यात 30 एम.एल.पेट्रोल कमी असल्याचे निदर्षनास आले. परिणामी पंपावरील चारही यंत्रांची तपासणी करण्यात आल्यावर डीझेल 20 एमएल ने कमी भरत असल्याचे निष्पन्न झाल्याने ग्राहकांची फसवणुकी बाबत खात्री झाली.
सर्व ग्राहकांसमक्ष आपण पाच लिटर पेटोल यंत्राद्वारे मापात भरणा केल्यावर त्यात सुमारे 30 एमएल पेट्रोलचा कमी भरणा आढळला, ग्राहक तक्रार करीत असल्या प्रमाणे रकमेच्या तुलनेतही पेट्रोल कमी-अधीक भरत असल्याने संबधीत पेट्रोलपंप यंत्राला सिल लावण्यात येवुन संचालकांना या बाबत नोटीस दिली जाईल. राहिला तांत्रिक बाबींचा विषय तर तो, तहसीलदार किंवा पुरवठा अधिकार्यांकडून पुढची कारवाई होईल. – सी.डी. पालीवाल, वजनमापे निरीक्षक