अन् बीसीसीआयची वेबसाइट झाली बंद

0

मुंबई । जगातले सगळ्यात श्रीमंत क्रिकेट बोर्ड म्हणजे बीसीसीआय. पण याच बीसीसीआयला वेबसाइट बंद झाल्याची नामुष्की ओढावली. वेबसाइटचे नूतनीकरण न केल्यामुळे बीसीसीआयची वेबसाइट बंद झाली होती. बीसीसीआयने वेबसाइटसाठी खरेदी केलेल्या डोमेनची वैधता 2 फेब्रुवारी 2006 ते 2 फेब्रुवारी 2019 पर्यंत आहे. वेबसाइटचे नूतनीकरण करण्याची शेवटची तारीख 3 फेब्रुवारी 2018 होती. पण बीसीसीआयने हे नूतनीकरण न केल्यामुळे वेबसाइटच बंद पडली होती. अखेर ही वेबसाइट सुरू करण्यात आली.

पण सेंच्युरिअनमध्ये भारत-दक्षिण आफ्रिकेमध्ये सामना सुरू असताना ही वेबसाइट बंद होती. वेबसाइटची नोंदणी करणार्‍या register.com आणि namejet.com यांनी बीसीसीआयच्या डोमेनच्या नावासाठी बोली लावायलाही सुरुवात केली होती. या डोमेन नावाला सात बोलीही मिळाल्या होत्या. 2010मध्ये आयपीएलचे माजी अध्यक्ष ललित मोदींनी हे डोमेन विकत घेतले होते. बीसीसीआयला आयसीसीकडून 405 मिलियन यूएस डॉलर्स मिळतात तर आयपीएल प्रसारणाचे हक्क स्टार स्पोर्ट्सला 2.55 बिलियन यूएस डॉलरला देण्यात आले. एवढा पैसा असूनही नूतनीकरण न केल्यामुळे वेबसाइट बंद पडल्याची नामुष्की बीसीसीआयवर ओढावली होती.