नवी दिल्ली : समाजवादी पक्षाचे नेते नरेश अग्रवाल यांनी मंगळवारी सचिन तेंडुलकर आणि अभिनेत्री रेखा राज्यसभेतील अनुपस्थितीकडे लक्ष वेधले होते. विजय मल्ल्याप्रमाणे दोघांनाही निलंबित करा, अशी मागणीही त्यांनी केली होती. त्यानंतर गुरूवारी सचिन राज्यसभेत अवतरला.
सचिनप्रमाणेच बॉक्सिंग क्वीन मेरी कोमही संसदेत उपस्थित होती. 2012 पासून सचिन तेंडुलकर राज्यसभेचा सदस्य आहे. तेव्हापासून 348 दिवसांच्या कामकाजापैकी तो फक्त 23 दिवस तर रेखा फक्त 18 दिवसच राज्यसभेत होत्या. यापूर्वीही त्यांच्या अनुपस्थितीवर अनेकदा टीका झाली आहे.