अपंगांच्या रॅम्पवर वाहनांचे अतिक्रमण

0

पुणे । हवेली तालुका पंचायत समिती कार्यालयात अपंगांसाठी उभारण्यात आलेल्या रॅम्पवर वाहने लावली जात आहेत. त्यामुळे अपंग नागरिकांना येता जाताना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. राज्य शासन व जिल्हा परिषदेच्या वतीने अपंगांसाठी विविध योजना राबविल्या जातात. त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी हवेली तालुक्यातील गावांमधून अपंग बांधव पंचायत समितीच्या कार्यालयात येतात. त्यांना कार्यालयात ये-जा करता यावी म्हणून शासनाने प्रत्येक कार्यालयामध्ये रॅम्पच्या माध्यमातून स्वतंत्र सोय केली आहे. मात्र, या रॅम्पवर पंचायत समितीमध्ये येणार्‍या नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांनी अतिक्रमण केले आहे. त्यामुळे अपंगांना ताटकळत उभे रहावे लागत आहे. मागणी सातव यांनी केली आहे.

अपंगांची गैरसोय
अपंगांसाठी तीन टक्के निधी राखीव ठेवला जातो. त्या माध्यमातून विविध योजना राबविल्या जातात. त्यांचा लाभ घेण्यासाठी अपंग येतात़ हवेली तालुक्यातील 60 टक्क्यांपेक्षा जास्त ग्रामपंचायती पहिल्या मजल्यावर आहेत. त्यातील बहुतांश ठिकाणी रॅम्प तसेच लिफ्टची सोय नाही. त्यामुळे अपंगांची गैरसोय होते. त्यातच पहिल्याच वेळी काम होत नाही. योजनांच्या लाभासाठी तीन ते चार वेळा चकरा माराव्या लागत असल्यामुळे अपंग बांधव योजनांचा लाभ घेण्यापासून दूर जातात. परिणामी त्यांना लाभापासून वंचित रहावे लागत असल्याची स्थिती असल्याचे प्रहार अपंग क्रांती आंदोलनाचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष धमेंद्र सातव यांनी सांगितले. जिल्ह्यातील पंचायत समिती तसेच ग्रामपंचायतींमध्ये अपंगांसाठी ये-जा करण्यासाठी असणार्‍या ठिकाणांवर संबंधित कार्यालयाने फलक लावणे गरजेचे असल्याची मागणी सातव यांनी केली आहे.