जपानमध्ये वनीला विमान कंपनीच्या एका अपंग प्रवाशाची माफी मागणे भाग पडले आहे. कारण त्या अपंग प्रवाशाला सरपटत विमानाच्या शिड्या चढणे भाग पडले. अमामी द्वीपसाठी उड्डाण करण्याआधी हिदेतो किजिमा हे त्यांच्या साथीदारांच्या मदतीने विमानात चढले. मात्र तेथून परतत असतांना कंपनीच्या कर्मचार्यांनी जर तुम्ही कुणाच्याही मदतीशिवाय विमानात चढणार नसतील, तर सुरक्षेच्या कारणाने त्यांना विमानात चढू दिले जाणार नाही, असे सांगितले. त्यानंतर किजिमा यांना एकटे सोडण्यात आले. त्यामुळे त्यांनी शेवटी सरपटत विमानाच्या शिड्या चढल्या. त्यानंतर 158 देशांमध्ये ते 200 वेळा गेले. तेथे कुठेही अपंग प्रवाशांसाठी सुविधा नव्हती. ते मित्रांच्या साहाय्यानेच विमान चढले. त्यांनी जपानच्या निप्पॉन टीव्हीला मुलाखत देताना सांगितले की, विमान कंपन्या सांगतांना अपंगांसाठी सुविधा असल्याचे सांगतात, प्रत्यक्षात मात्र सुविधा दिल्या जात नाही.