जळगाव। जळगाव जिल्हा भाजपा कार्यालयात जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाभरातील भाजपाचे विविध पदाधिकारी घेण्यात आली. यावेळी जळगाव जिल्हा भाजपा अपंग आघाडीची कार्यकारिणी जाहीर करण्यात आली. कार्यकारिणीच्या अध्यक्षपदी विभागाचे अरूण पाटील यांची निवड करण्यात आली.6 एप्रिल ते 14 एप्रिल हा भाजपाचा वर्धापन दिन साजरा करण्याबाबत विविध सुचना व मार्गदर्शन तालुक्यातील सर्व कार्यकर्त्यांना जिल्हाध्यक्ष उदय वाघ यांनी दिल्या. त्यावेळी सर्व आघाडी यांच्याशी विचारपूस करून भाजपा पक्षाचे कार्य अधिक मजबुत व संघटीत करण्याचेही आवाहन केले. कार्यकारिणी सदस्याची
कार्यकारिणी सदस्य
जिल्हाध्यक्षपदी अरूण पाटील, योगेश चौधरी, रविंद्र खैरनार, भरत परदेशी, प्रफुल्ल जोशी, राजेंद्र पाटील, कमलाकर चौधरी, पुरूषोत्तम महाजन, राजु पुरकर, उध्दव कवटे, सुनिल अहिरे, विजय महाजन, देविदास ठाकरे, जिजाबराव पाटील आदींची निवड करण्यात आली.