जळगाव । जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत असलेले कर्मचार्यांना अपंगत्व असल्याचे प्रमाणपत्र वैधतेची पडताळणी करुन हे प्रमाणपत्र संबंधीत अस्थापनाकडे सादर करावयाचा आहे. अपंगत्व असलेल्या कर्मचारी, अधिकार्यांनी जिल्हा शल्य चिकित्सक यांनी प्रमाणीत केलेले अपंग प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. ज्या अपंग कर्मचार्यांना अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे बदली, पदोन्नती अथवा इतर सवलतीचा लाभ घेतला असेल किंवा घ्यावयाचा असल्यास शासकीय वैद्यकिय रुग्णालय धुळे येथील समितीकडून अपंगत्व प्रमाणपत्राची पडताळणी करणे अनिवार्य राहिल. पडताळणीत काही तफावत आढळून आल्यास संबंधीतांविरुध्द फसवणूकीचा गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. याबाबतीत कोणतीही दिरंगाई अथवा विलुंब होणार नाही यांची दक्षता घ्यावी अन्यथा सर्वस्वी जबाबदारी संबंधीत विभागप्रमुख्यांची राहिल असे आदेश जिल्हा परिषद मुख्यकार्यकारी अधिकारी कौस्तुभ दिवेगावकर यांनी दिले आहे.