अपंग कल्याण निधीतून चक्क कुकरची भेट!

0

बारामती । बारामती तालुक्यातील पणदरे येथील ग्रामपंचायतीच्या सावळा-गोंधळा कारभाराचा नमुना समोर आला आहे. पणदरे ग्रामपंचायतीने अपंग कल्याण निधीतून लाभार्थ्यांना चक्क कुकरच भेट दिले आहेत. एकूण बारा लाभार्थ्यांना हे कुकर देण्यात आलेले आहेत. कुकर देताना कुकरची क्षमता तसेच कुकर देण्याचे प्रयोजन याबाबत कोणतेही स्पष्टीकरण केले नाही. कुकर दीड लिटरचे असून त्याची किंमत बाजार भावापेक्षा दुप्पट किंंमत लावली आहे. ग्रामपंचायतीने चांगल्या वस्तू अपंगाना देण्याऐवजी अशा कुठल्यातरी वस्तू देऊन बोळवन केल्याचा आरोप केला जात आहे.

गैरव्यवहाराविषयी उपोषण
नुकतेच पणदरे ग्रामपंचायतीच्या गैरव्यवहाराविषयी उपोषण झालेले होते. यावेळी पुणे जिल्हा परिषदेने संपूर्ण कारभाराची चौकशी केली जाईल. प्रत्यक्षात मात्र अद्यापही या कारभाराची चौकशी सुरू नाही. त्यामुळे ग्रामस्थांममध्ये पंचायत समितीच्या कारभाराविषयी चांगलीच नाराजी आहे. पणदरे ग्रामपंचायतीच्या कारभाराची चौकशी झाली पाहिजे अशी मागणी पुन्हा विक्रम कोकरे यांनी केली आहे.