अपंग बांधवांचे विविध मागण्यासाठी ठिय्या आंदोलन

0

भिवंडी : टेमघर पाडा येथील अपंग सहयोगी संस्थेतर्फे अपंग बांधवांना भेडसावणार्या दैनंदिन समस्या त्याचप्रमाणे सोयी सवलती मिळाव्यात यासाठी संबंधित विभागांशी वारंवार पत्रव्यवहार करूनही महापालिका प्रशासन त्याकडे अक्षम्य डोळेझाक करीत आहे. अपंगांच्या मागण्या तातडीने न सोडविल्यास महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन करू असा इशारा देण्यात आला होता.

मात्र प्रशासनाने कोणतीही कारवाई न केल्याने अखेर अपंगांनी आज महापालिकेसमोर ठिय्या आंदोलन सुरू केल्याची माहिती अध्यक्ष वसंत कृष्णा नाईक यांनी दिली. प्रामुख्याने क्षेत्रातील अपंग बांधवांचे सर्वेक्षण करून त्याबाबत नोंदी ठेवणे, 3 टक्के आरक्षित निधी अपंगांच्या पुनर्वसनासाठी खर्च करणे महापालिकेच्या विविध प्रभागात सवलतीच्या दरात गाळे उपलब्ध करून देणे या 10 मागण्या निवेदनाद्वारे करण्यात आल्या होत्या. मात्र महापालिका प्रशासनाने समाधानकारक कोणतीही कारवाई न केल्याने अखेर ठिय्या आंदोलन करावे लागले शासनाने महापालिकेला आमच्या मागण्या मान्य करण्यासाठी तातडीने आदेश द्यावेत अशीही विनंती अध्यक्ष नाईक यांनी केली.